जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत यांची मुदत संपलेली आहे. अश्यावेळी त्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यात बहुतांश प्रशासक हे विद्यमान सरपंचच आहेत.
मात्र ही आता डोकेदुखी ठरत आहे. प्रशासकाला बऱ्याच मर्यादा पडत असल्याचे निदर्शनास येत आहेत. निधी खर्च करताना आणि प्रलंबित बिले काढताना प्रशासक आणि संबंधित ठेकेदार यांच्यात वादाची ठिणगी पडताना पाहायला मिळत आहे.
अश्यावेळी सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समिती सदस्य यांनी गटविकास अधिकारी निलेश जाधव यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. न्यायालयाचे आदेश असल्याने आपण त्यात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. त्याचप्रमाणे हा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आला आहे. त्याची लवकरच सुनावणी होऊन हा प्रश्न मार्गी लागू शकतो असा विश्वास यावेळी गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी व्यक्त केला.
मात्र प्रशासनाच्या या निर्णयामुळे बऱ्याच ठेकेदारांचे पैसे अडकल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी मागणी होत आहे.
या संदर्भात प्रश्न मांडण्यासाठी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव,महेश धुरी , सदा राणे, जितेंद्र गावकर, प्रणाली टिळवे, उदय पारिपत्ये, शरद धाऊस्कर, आदि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते..