रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे मध्ये इको-फ्रेंडली राखी मेकिंग ऍक्टिव्हिटी उत्साहात पार पडली.

विद्यार्थ्यांनी प्लास्टिकला फाटा देत पानं, फुलं, बिया, कापूस यांसारख्या नैसर्गिक साहित्यापासून आकर्षक राख्या बनवल्या. या बियांच्या राख्या नंतर मातीत लावल्यास त्यापासून नवीन रोप उगवणार आहे.

उपक्रमाची सांगता अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने झाली. शाळेच्या *प्री-प्रायमरी आणि प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी शाळेच्या आवारातील झाडांना हाताने बनवलेल्या राख्या बांधून ‘वृक्ष बंधन’ साजरे केले.* झाडे आपले रक्षण करतात, आता आम्ही झाडांचे रक्षण करू, अशी शपथ मुलांनी घेतली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण झाली असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!