जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांनी आपल्या प्रभागातील ग्रामपंचायत माजगांव क्षेत्रातील नागरी सुविधा व विकासाच्या दृष्टीने १५ व्या वित्त आयोगातर्गत ४५ लाख निधीची कामे मंजूर करण्यात आणली आहेत.

यासाठी झालेल्या ग्रामसभेत त्यांचा अभिनंदन आणि आभाराचा ठराव मांडण्यात आला.

सदर निधीमुळे गावातील मुख्य व आवश्यक विकासकामांना मोठी गती मिळणार असून ग्रामस्थ्यांच्या सोयी – सुविधामध्ये भरीव सुधारणा होणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून गावाच्या विकासासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता आणि केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल ही ग्रामपंचायत मासिक सभा मा. जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करत आहे व त्यांचे मनःपूर्वक आभार ग्रामसभेमध्ये मानण्यात आले..

error: Content is protected !!