सावंतवाडी तालुक्यातील मिलाग्रिस शाळेची गुणवान खेळाडू कुमारी विधि सुनिल मिशाळ हिची 20 वी सब-ज्युनियर (U-14) महाराष्ट्राच्या रोलबॉल संघातील टॉप १२ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. ही निवड केवळ विधिच्या मेहनतीचा गौरव नसून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मुलगी म्हणून महाराष्ट्राच्या रोलबॉल संघात स्थान मिळवण्याचा मान सावंतवाडीच्या विधिने मिळवला आहे!
लहानशा भागातून सुरू झालेला तिचा प्रवास आज महाराष्ट्राच्या संघापर्यंत पोहोचला आहे. तिची जिद्द, मेहनत, सातत्य आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. रोल बॉलच्या मैदानावर आपल्या चपळाईने ,जिद्दीने आणि उत्कृष्ट खेळाने ठसा उमटवणाऱ्या विधिने आपल्या गुणवत्तेची प्रभावी मोहोर उमटवली आहे.
🇮🇳 राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा
📅 दिनांक : २७ ते ३० डिसेंबर २०२६
📍 स्थळ : मेघालय
या राष्ट्रीय स्पर्धेत विधि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे, ही सिंधुदुर्ग वासियांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! राष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचा आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढव.
तिचे मार्गदर्शक श्री. सागर सावंत तसेच मिलाग्रिस हायस्कूल चे फादर रिचर्ड सालढाणा आणि क्रीडाशिक्षक श्री हितेश मालंडकर आणि शेरॉन अल्फोन्सो या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.