सामाजिक बांधिलकीच्या सेवा यज्ञात जेष्ठ्यांच्या योगदानाचा सन्मान आणि अनुभवाच्या शिदोरीचा गौरव करणारा सोहळा आंबोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचे आंबोली येथील जेष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ यांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी हा सन्मान सोहळा पार पडला.

समाज जीवनात जेष्ठ्यांचे मार्गदर्शन, त्यांचा अनुभव आणि संघटनात्मक कार्यातील योगदान यांना अनन्यसाधारण महत्व असते. याच भावनेतून विनोद राऊळ यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या सत्कारामुळे कार्यक्रमास विशेष महत्व प्राप्त झाले. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा संकल्प आणि जेष्ठ्यांच्या कार्यांचा गौरव असा सेवाभावाचा दुहेरी संगम आंबोली येथे पाहायला मिळाला.

या सोहळ्यास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी नगरपरिषदेचे उप नगराध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर, भाजपचे राज्य युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, नितीन राऊळ, पंचायत समितीचे उप सभापती गौरव मुळीक, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, माजी सरपंच गुलाबराव गावडे, गेळेचे सरपंच सागर ठाकरे आदि मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याने विशेष रंगत आणली.

error: Content is protected !!