समाजकारण आणि राजकारण यात अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांनी आपली छाप पाडली ते युवा नेतृत्व म्हणजे विशाल परब. क्षेत्र कोणतेही असो तिथे त्यांचं दातृत्व हे नेहमीच पाहायला मिळत. केवळ नाव विशाल नाही तर त्यांचं कार्य देखील तसंच पाहायला मिळत आहे.

त्यांच्या दातृत्वाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील एक महिला प्रसूतीसाठी गोवा बांबूळी येथे पाठविण्यात आली होती. तिथे ८ दिवस राहिल्यावर त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र ऐनवेळी कोणतीही सोय उपलब्ध न झाल्याने त्या महिलेच्या पतीने ही बाब विशाल परब यांच्या कार्यालयातील धिरेंद्र म्हापसेकर यांच्या कानावर घातली.

लागलीच त्यांनी पुढील चक्रे फिरवून खास सावंतवाडी येथून रुग्णवाहिका गोवा बांबूळी येथे पाठवून दिली. युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून होत असलेली हि रुग्णसेवा खरोखरच ग्रामीण भागातील नागरिकांना वरदान ठरत आहे. त्यांच्या या दातृत्वाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!