गेले काही दिवस सावंतवाडी नगरपालिकेतील पाणी प्रश्न सतत गाजत आहे. देशात, राज्यात आणि जिल्ह्यात युतीत असलेले भाजप आणि शिवसेना ( शिंदेसेना ) हे दोन्ही सत्ताधारी पक्ष सावंतवाडी नगरपालिकेमध्ये एकमेकांच्या सातत्याने विरोधात पाहायला मिळत आहेत.

आज सावंतवाडी विश्रामगृह येथे शिवसेना जिल्हा प्रमुख, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक संजु परब यांनी पत्रकार परिषद घेत नळपाणी योजनेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गेले ७ महिने बंद असलेल्या या कामाबाबत जोरदार हल्ला चढवीला. एकदा प्रशासनाकडून या कामाला हिरवा कंदील मिळाला असताना हे काम मुख्याधिकाऱ्यांनी का रोखले हे जाहीर कराव.

भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर येथील जनतेने काय करावे असा सवाल देखील यावेळी संजु परब यांनी उपस्थित केला. येत्या ८ दिवसात जर काम पुन्हा सुरु न केल्यास आपण मुख्याधिकारी यांना सर्व शिवसेनेचे नगरसेवक घेराव घालू असा इशारा आज पत्रकार परिषदेत संजु परब यांनी दिला. यावेळी नगरसेवक देव्या सूर्याजी,सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर,अजय गोंदावळे,स्नेहा नाईक, बंटी पुरोहित आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!