हा आहे एका फिल्म मधील प्रसिद्ध संवाद. हा संवाद तंतोतंत लागू होतोय तो शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना.

असं म्हणतात राजकारणात टाईमिंग महत्वाची आहे. ज्याची टायमिंग चुकली त्याला सर्व सोडावं लागत मात्र ज्याला टायमिंग साधता आली तो सर्व काही करू शकतो.नेहमीच समाजकारण ते राजकारण असा प्रवास करणारे संजू परब हे अन्यायाच्या विरोधात उभे राहिले. राणे कुटुंबियांची भक्कम साथ यामुळे त्यांनी अनेक अडचणींवर मात केली.

अगदी सुरुवातीपासून राणे कुटुंबीय आणि संजू परब यांचं अनमोल असं नातं तयार झालं होत. राणे कुटुंबीय जिथे जिथे संजू परब तिथे तिथे हे समीकरण नवीन नाही.मात्र जेव्हा माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यावेळी सुद्धा संजू परब काँगेसवासी झाले. त्यावेळी काम करत असताना त्यांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागले मात्र त्यातही त्यांनी आपल्या कामातून करिष्मा दाखवला.

आज त्यांची आमदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून विशेष ओळख आहे. विद्यमान खासदार नारायण राणे साहेब, विद्यमान आमदार पालकमंत्री नितेश राणे, निलेश राणे यांनी एकत्र भाजप मध्ये प्रवेश केला होता.मात्र निलेश राणे यांनी भाजपशी फारकत घेत शिवसेनेमध्ये ( शिंदेसेना ) प्रवेश करत कुडाळ -मालवण विधानसभा लढविली आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करतेवेळी संजू परब यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. निलेश राणे अनेकवेळा मोठ्या मंचावर, सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे बोलले देखील की संजू सारखा मित्र लाभणे खरोखरच देवाची कृपा..

हे सर्व जरी खरं असलं तरी राजकारणात सगळीच वेळ सारखी नसते. अनेक आघात सोसावे लागतात. वेळ, काळ, प्रसंग न पाहता नागरिकांच्या मदतीला धावावे लागते. कधी कधी जेव्हा राजकारणात आपली वेळ नसते तेव्हा शांत राहणे हे गरजेचे असते. विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या सानिध्यात आल्यावर हा गुण संजू परब यांच्यात नक्कीच आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच त्यांच्यावर जिल्हाप्रमुख या महत्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली. वेळोवेळी विरोधकांना चितपत करत ते नेहमीच किंगमेकर ठरले.

येणाऱ्या काळात त्यांचे राजकारण कसे असेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. आज त्यांच्याकडे आमदारकीचा चेहरा म्हणून देखील पाहिलं जात आहे. मात्र अनेक मात्तबर विरोधक त्यांच्या विरोधात षड्डू ठोकून उभे आहेत.त्यांच्याजवळ सत्ता, पैसा यांच पाठबळ पाहायला मिळत आहे. मात्र सामान्य नागरिकांचा पाठिंबा हा संजू परब यांचा मोठा विजय आहे. सर्वसामान्य लोकांना संजू हा आपल्या घरातीलच एक मुलगा, भाऊ वाटत आहे. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असली तरी या योध्याबद्दल पुन्हा एकदा एवढंच म्हणेन..

हाथी, घोडे, तोफ, तलवारे, फौज तो सबकी भारी है

सियासत मै उतरा संजू अब भी सबपर भारी है..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!