शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यास उद्योगमंत्री उदय सामंत,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. दीपकभाई केसरकर तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, सर्व उपतालुकाप्रमुख, सर्व शहरप्रमुख, सर्व उपशहरप्रमुख, सर्व विभागप्रमुख, सर्व उपविभागप्रमुख, सर्व शाखाप्रमुख, तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि शिवसेना पक्षातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे.
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडीच्या वतीने अध्यक्ष राहिलेल्या संजु परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा कृष्ण हनुमान युद्ध हा नाट्यप्रयोग होणार आहे .तरी सर्व नाट्यप्रेमी मंडळींनी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता गोविंद चित्र मंदिर याठिकाणी उपथित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ, आणि विद्यमान अध्यक्ष रविंद्र मडगावकर यांनी केले आहे.
Been playing on 4777cxgame for ages now, and I gotta say, they keep things fresh. New games popping up all the time, and the payouts are decent. Give it a whirl at 4777cxgame.