सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथील बहुप्रतीक्षित ताज हॉटेल प्रकल्पासाठीचा त्रिपक्षीय करार आज मंत्रालयात मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री सौ.सुनेत्रा पवार जी, मा.पर्यटनमंत्री श्री.शंभूराज देसाई जी, आमदार श्री.दीपकजी केसरकर, तसेच वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या पंचतारांकित ‘ताज’ हॉटेलच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या, उद्योजकांसाठी व्यवसायाच्या आणि स्थानिक नागरिकांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळून प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे.

सिंधुदुर्गचा निसर्गरम्य समुद्रकिनारा, सुंदर किनारे, ऐतिहासिक किल्ले, समृद्ध वनसंपदा आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा यांना ‘ताज’च्या आगमनाची जोड मिळाल्याने सिंधुदुर्गला देशातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

 

One thought on “सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन नकाशावर अधोरेखित करणारा ऐतिहासिक दिवस..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!