गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल चा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही राजघराण्यामध्ये झालेली यशस्वी शिष्टाई, तसेच अनेक वकील, पत्रकार, सर्व नागरिक यांनी जो लढा पुकारला होता त्यामुळे हे यश मिळाल्याचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी झूम द्वारे सावंतवाडी येथील पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये कर्करोग ( कॅन्सर ), ब्रेन ( मेंदू ),हार्ट (हृदय ), युरोलॉजी ( किडनी, मुत्राशय ) या सारख्या गंभीर आणि मोठ्या आजारांवर उपाय आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अर्थात याचा लाभ इथल्या सामान्य जनतेला नक्कीच होणार आहे. ८० कोटी अपेक्षित असलेल्या या हॉस्पिटलसाठी निधी आणला तो केवळ न केवळ सामान्य जनतेसाठीच.

दरवर्षी सुमारे १० हजार व्यक्ती ह्या गोवा बांबूळी किव्हा अन्य ठिकाणी उपचारासाठी जात. त्यात कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. म्हणूनच काहीही झाले तरी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल हे करून दाखवणार. यासाठी राजघराण्यासोबत वार्तालाप करून, मंत्रालयात त्यांच्यासोबत बैठका घेणे हे सर्व चालूच होते. त्यात आता यश आलंय हे पाहून खूपच समाधान वाटत असल्याचे यावेळी दीपकभाई केसरकर यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!