विद्यार्थ्यांनी स्वतःला कमजोर न समजता आपल्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे हे ठरवून आतापासूनच आपण पुढील काळात काय करणार याचा संकल्प निर्धार केला तर तुम्ही दहावी बारावीनंतर पुढील जीवनात यशाचे शिलेदार बनाल ग्रामीण भागाची नाळ असलेले शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी समाजकार्य आणि दातृत्व या व्यक्तिमत्त्वामुळे ते आज राजकीय क्षेत्रात आपली वेगळी उंची ठेवून आहेत त्यांनी जो संघर्ष आणि मेहनत घेतली त्यामुळेच त्यांना आज अनेक क्षेत्रात यश मिळत आहे त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी स्पष्ट केले कुणकेरी आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाला टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ या प्रशिक्षण वर्गाला निश्चितपणे सहकार्य केले जाईल यातून विद्यार्थ्यांना एक नवी दिशा प्रेरणा मिळेल असे उपक्रम शाळेत राबवा असेही त्यांनी स्पष्ट केले

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्ताने सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन व जतन पर्यावरण बचाव असा उपक्रम 19 व 20 ऑगस्टला अशा दोन दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात शंभर सुपारीची झाडे वाटप करण्यात आली व वृक्ष संवर्धन व जतन व पर्यावरण बचाव तसेच मुलांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ माजी सभापती प्रमोद सावंत सरपंच श्रीमती सोनिया सावंत सह्याद्री फाउंडेशनचे माझी सचिव ॲड संतोष सावंत माजी अध्यक्ष प्रल्हाद तावडे माजी सचिव सुहास सावंत पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष राजन मडवळ मुख्याध्यापिका सौ अर्चना सावंत शिक्षक प्रताप गाडगीळ दीप्ती सावंत अनिल परब राजन गोसावी आदी उपस्थित होते यावेळी श्री राऊळ पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी दहावी बारावी मध्ये असतानाच मला पुढे काय बनायचे आहे हे आताच ठरवायला हवे आणि त्यानुसार त्या दिशेने वाटचाल करायला हवी आज सर्व क्षेत्रात जे काही चमकत आहेत ते पाहतात त्यांची जिद्द आणि चिकाटी आणि त्यांनी त्या काळात जे शिक्षण घेतले त्यावेळी त्यांनी ठरवलं होतं की मला काहीतरी बनायचं आहे आणि त्या जिद्दीवर ते आज आपापल्या क्षेत्रात करिअर घडवून आहेत तसा आदर्श तुम्ही कायम ठेवा कुणकेरी माध्यमिक विद्यालयात ज्या काही भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब तसेच सह्याद्री फाउंडेशन निश्चितपणे प्रोत्साहन देईल असे त्याने स्पष्ट केले यावेळी ॲडसंतोष सावंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे व्यक्तिमत्व पैलू विशद केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी शमिका कदम तर आभार प्रताप गाडगीळ यांनी मानले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!