आपल्या वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आर पी डी हायस्कुलने राज्यस्तरावरही आपला डंका गाजवला आहे.

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत आर पी डी हायस्कुलने प्रभावी कामगिरी केली आहे.या विद्यार्थ्यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

राज्यस्तरीय (शहरी ) गटात चमक दाखवलेले विद्यार्थी :

१- कु. अश्लेषा उद्धव माळवे (९वी )

२- कु. श्रुष्टि गोविंद परब (९वी )

चौथा क्रमांक -रोख रुपये ७५०० आणि सन्मानचिन्ह..

कु. सोहम बापूशेट कोरगावकर (९वी ) पाचवा क्रमांक – रोख रुपये ५००० आणि सन्मानचिन्ह..

जिल्हास्तरीय १ ( शहरी ) गटात यश मिळवलेले विद्यार्थी –

प्रथम क्रमांक -तेजस्वी सगम

द्वितीय क्रमांक – अमेय आपटे

तृतीय क्रमांक – साक्षी गुरव

तालुकास्तरीय ( शहरी ) गटात यश मिळवलेलं विद्यार्थी –

प्रथम क्रमांक – शमिका केदार महादेव परब

द्वितीय क्रमांक – जान्हवी मेस्त्री

तृतीय क्रमांक – अथर्व देवस्थळी

जिल्हास्तरीय विजेत्यांना जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते लवकरच समारंभपूर्वक बक्षिसे व स्मृतीचिन्ह प्रदान केली जाणार आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव वी.बी.नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, प्र. मुख्याध्यापक समिधा नाईक, उपप्राचार्य, प्र. उपप्राचार्य सविता कांबळे, पर्यवेक्षक एन. जी. मुंठे, तसेच पालक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक पालक संघ यांनी विशेष कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!