शासन स्थरावरून आंबा, काजू पीक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र ती गणेश चतुर्थी पूर्वी मिळावी.अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तसेच शासनाने पीक पाहणी नोंदणी करण्याचे काम सुरु केले आहे.मात्र पीक पाहणी नोंदणी सहाय्यक यांच्याकडे नोंदणी वेळेवर होत नाही आणि होणार देखिल नाही.तसेच पीक नोंदणीची एकदा मुदत संपल्यावर त्या नोंदी होणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. यासाठी पूर्वीप्रमाणे पीक नोंदणी ही तलाठी यांच्याजवळच देण्यात यावी यासाठी आज सावंतवाडी तहसील येथे तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. तहसीलदारांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.

यावेळी माजी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर,व्ही. जे. एन. टी. अध्यक्ष आनंद वरक, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष राजेश जाधव, तालुका संघटक संजय गावडे, विभाग प्रमुख संजय माजगावकर, युवा तालुकाप्रमुख प्रशांत जाधव, सचिव विश्वास घाग, उप विभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, ओबीसी उपतालुका प्रमुख लक्ष्मण भालेकर, सावंतवाडी उपतालुका प्रमुख राकेश पवार, माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर, एकनाथ गावडे आदि पदाधिकारी उपस्थित होते..

You missed

error: Content is protected !!