आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस प्रशालेच्या *माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता* प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात करण्यात आले आहे.
त्या काळात पंचक्रोशीतील काही जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत शाळा सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे *आरोस, साटेली, तळवणे, मळेवाड, दांडेली आणि सातार्डा* या गावांतील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. गेल्या अनेक दशकांमध्ये *आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाने* शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे.
संस्थेच्या मदतीने, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सन २०२५ मध्ये आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.
या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच शाळेच्या भविष्यातील विकासासाठी विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची सदस्य नोंदणी देखील करण्यात येणार आहे. या स्नेह मेळाव्यास प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, आरोस यांच्यावतीने करण्यात आले आह.