सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान पक्षातील काही पदाधिकारी यांनी पक्षशिस्तीच्या विरोधात काम केलेले असल्याने त्यांचे पक्षीय निलंबन केले होते. त्यातील काही पदाधिकारी यांनी आपली चूक लक्षात येताच पक्षाकडे निलंबन रद्द करण्यासाठी विनंती केली होती.
पक्षपातळीवर पक्ष पदाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करून शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात येत असून त्यांना पुन्हा पक्षकार्यासाठी संधी देण्यात येत असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
निलंबन मागे घेतलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
1) नितीन एकनाथ राऊळ
2) डायगो ( मायकल ) फ्रान्ससिस डिसोझा
3) सुजाता अजित पडवळ
4) जितेंद्र पांडुरंग गावकर
5) शर्वाणी शेखर गावकर
6) स्वागत रघुवीर नाटेकर
7) योगेश अशोक केणी
8) उल्हास उत्तम परब
9) स्नेहल संदिप नेमळेकर
10) साक्षी संदिप नाईक
11) सुप्रिया शैलेश नाईक
12) प्रवीण नारायण परब
13) अनिरुद्ध फाटक