वेंगुर्ला : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या रेडी येथील द्विभूज गणपती मंदिर येथे माघी गणेश जयंती विनायक चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता गणेश मूर्तीवर अभिषेक करून या उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सत्यविनायक महापूजा दुपारची आरती व तीर्थप्रसाद महाप्रसाद व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत स्थानिक भजने होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन श्री अजय सिंग देसाई आणि मित्रपरिवार कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी यांनी केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!