सावंतवाडी : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये अखेर महायुतीचे उमेदवार महेश सारंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.महेश सारंग यांच्या उमेदवारीवरून बरेच तर्क वितर्क वर्तीवले जात होते. मात्र यावर मात करत महेश सारंग यांनी उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली.
कित्येक वर्षे भाजप पक्षाचे अहोरात्र करत असलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचे यावेळी महेश सारंग यांनी सांगितले. खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा विश्वास सार्थकी लावत कोलगाव जिल्हा परिषदवर भाजपचाच झेंडा फडकविणार असे महेश सारंग यांनी उमेदवारी अर्ज भरताना सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ पदाधिकारी मंदार कल्याणकर, भाजपा आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, प्राजक्ता केळुस्कर, अशोक माळकर, बलवंत कुडतरकर, चंदन धुरी, दिनेश सारंग, संदीप हळदणकर, शिवाजी परब, सुनील परब, राजन राऊळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!