सावंतवाडी : संकट कोणतेही असो हाक दिल्यावर धाव घेणारा आणि संकटाचे निवारण करणारा अशी ज्याची ओळख असणाऱ्या आणि ३६४ खेड्यांचा अधीपती असलेल्या श्री देव उपलरकर देवाचा वार्षिक उत्सव दिनांक ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या उत्सवाची सुरुवात सकाळी अभिषेक आणि पूजेने करण्यात येणार आहे. त्यानंतर तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी दशावतार नाटक असे एकंदरीत कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान चे मानकरी विद्याधर नाईक – शीतप, शुभम नाईक – शीतप यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!