सावंतवाडी : केवळ राजकारण न करता समाजकारणातून आपला वेगळा ठसा उमटून अल्पावधित सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात यशस्वी कामगिरी करून लोकांच्या पसंतीस पडलेले माजगाव जिल्हापरिषद मतदार संघातील उमेदवार म्हणजे विक्रांत विकास सावंत. वडिलांचा, आजोबांचा फार मोठा राजकीय वारसा असून देखील त्याचे दडपण न घेता केवळ सर्वसामान्य लोकांचा विकास हे ध्येय घेऊन ते आज माजगाव जिल्हापरिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या कार्याने निश्चितच माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाची धुरा जनता युवा नेतृत्वाकडे सोपवेल यात कोणतीही शंका नसेल. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!