रात्रीचा राजा आणि दिवसाचा बोजा अशी काहीशी परिस्थिती दशावतार कलावंतांची पाहायला मिळत होती. रात्रभर या लोक कलेतून लोकांचं मनोरंजना बरोबरच प्रबोधन करायचं आणि सकाळी उठून पुन्हा आपल्या रोजी रोटी साठी वणवण करायची हा दिनक्रम ठरलेला असायचा. एखाद्या कंपनीकडे तो कलाकार ठरल्यावर जी नाईट मिळायची तेच उत्पन्नाचे साधन. यावर वेळोवेळी आवाज उठवीला होता मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
मालवण कुडाळ चे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांनी दशावतार कलाकारांचा हा प्रश्न उचलून धरला. कलाकारांना कोणतेही उत्पन्नाचे ठोस साधन नाही, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपली कला सादर करावी लागते यामुळे त्यांना कलाकार म्हणून ओळखपत्र नाही, मिळणारे अनुदान कलाकार म्हणून ते कलाकारांपर्यंत पोचत नाही, एवढी जुनी कला असून देखील कधीही कोणत्याही दशावतार कलाकाराला कधी एखादा पुरस्कार मिळाला नाही असे अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी दशावतार कलेची व्यथा मांडली..
यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी देवेंद्र नाईक, दत्तप्रसाद शेणई, संतोष रेडकर, राजाराम धुरी, शरद मोचेमाडकर हे सदस्य म्हणून लवकरच सांस्कृतिक मंत्रालयात दशावतार समिती सदस्य म्हणून काम पाहतील, त्याचप्रमाणे प्रत्येक दशावतार कलाकाराला ओळख पत्र प्रदान करण्यात येणार,अनुदान २कोटी २० लाखावरून ४ कोटी ४० लाखापर्यंत वाढवणार तसेच अनुदान थेट कलाकाराच्या खात्या मध्ये जमा होणार अशी पावसाळी अधिवेशनात घोषणा केली.
त्यांनी केलेल्या या घोषणेमुळे सर्व दशावतार कलावंतानी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मालवण कुडाळ चे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. भविष्यात नक्कीच दशावतार कलेला चांगले येतील. यामुळे युवा पिढी देखील दशावतार कळेजवळ ओढली जाईल असा विश्वास पारंपारिक दशावतार लोककला कलाकार संघ , सिंधुदुर्ग चे सल्लागार दत्तप्रसाद शेणई यांनी व्यक्त केला..
