आज महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब तसेच भाजपा च्या माध्यमातून सावंतवाडी भटवाडी शाळा नं. ६ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता पेडणेकर, दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी बोलताना साळगांवकर म्हणाले की कर्तृत्व, दातृत्व असणारे विशालजी परब हे येणाऱ्या काळातील सक्षम नेतृत्व बनतील याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. गेली अनेक वर्षे शैक्षणिक साहित्य वाटप, छत्री वाटप, टीशर्ट वाटप, शिधा वाटप, आपत्तीत सापडलेल्यांना मदत, वैद्यकीय मदत या माध्यमातून विशालजी परब हे या मतदारसंघातून घराघरात पोहचले आहेत. अनेक स्तुत्य उपक्रम ते दरवर्षी घेत असतात. या भागातील शाळेंच्या अडचणी बाबत आम्ही सर्व नक्कीच विशालजी परब यांच्याशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू.

यावेळी सोबत कुणाल शुंगारे, मिसबा शेख, प्रसाद कशाळीकर, नवल साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर, केतन आजगांवकर, गुरू पेडणेकर आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!