श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘युथ, क्राईम अँड जस्टीस : महाराष्ट्र अँड मध्यप्रदेश’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. कृपा दृष्टी पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला ISBN 978-81-69896-50-4 हा क्रमांक प्राप्त झाला आहे.
तरुणाई, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्था या परस्परांशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांचा
अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे. कायदा, सामाजिक प्रश्न आणि युवकांशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण वेध घेणारे हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक, कायदे अभ्यासक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणारे आहे.
ऍड. डॉ. अस्मिता सावंत भोसले या कायदेविषयक अभ्यासक व संशोधक असून शिक्षण क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहेत. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी संस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून युवक, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्था या विषयांकडे व्यापक आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या या साहित्यिक व संशोधनपर योगदानाबद्दल शिक्षण, कायदा आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.