एमकेसीयेलकडून दिल्या जाणाऱ्या मोफत अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत केली.
सध्याचे युग इंटरनेटचे युग आहे ते आहे प्रमाण तंत्रज्ञान जिल्ह्याचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळायला हवे भविष्यात याच्याच माध्यमातून त्यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यासाठी तंत्रज्ञान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा अशी मागणी विक्रांत सावंत यांनी केली. तसेच इतर शैक्षणिक समस्याही विक्रांत सावंत यांनी मांडत शिक्षणाच्या बाबतीत कोणते तडजोड होता कामा नये असे स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी विक्रांत सावंत यांनी आपली मागणी मांडली.यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी सुबोध माने, सदस्य प्रमोद रावराणे, नितीन राऊळ, गुरुनाथ पेडणेकर, विक्रांत सावंत जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यज्ञा साळगावकर, प्राची इस्वलकर,संतोष वारंग, अनंत कोंडके, अपर्णा सातस्कर, श्रावणी रावराणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी विनायक पाटील,तसेच सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते..