सम्राट क्लब इंटरनॅशनलशी संलग्न असलेल्या सम्राट क्लब मयेतर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधून गोवा राज्यातील सर्व सम्राट क्लब्स तसेच सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या सदस्यांसाठी राज्यस्तरीय रील्स बनवणे (Reel Making Competition) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्कृती, मैत्री आणि सेवेचा संदेश देणाऱ्या सम्राट क्लब मयेमने यंदाच्या गणेशोत्सवासाठी “माझी गणेश चतुर्थी: स्वच्छतेपासून विसर्जनापर्यंत” (My Ganesh Chaturthi: From Cleanliness to Visarjan) ही विशेष संकल्पना (Theme) निश्चित केली आहे. घरातील साफसफाई, सजावट, मूर्ती स्थापना, पूजा-आरती, नैवेद्य-मोदक, कौटुंबिक परंपरा आणि विसर्जन अशा गणेशोत्सवाच्या संपूर्ण प्रवासाचे चित्रीकरण या रील्सच्या माध्यमातून करायचे आहे.

स्पर्धेच्या अटी व नियमावली:

पात्रता: गोव्यातील सर्व सम्राट क्लब्स व सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचे सदस्य.

कालावधी: रील्सचा कालावधी ३० ते ९० सेकंद असावा.

भाषा: कोकणी, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी.

रचना: रील्स मूळ (Original) आणि स्वतः तयार केलेली असावी.

मूल्यांकन: कल्पकता, विषयवस्तु (Content), सादरीकरण, सांस्कृतिक मूल्य आणि एकूण प्रभाव यांवर विजेत्यांची निवड केली जाईल.

पारितोषिक वितरण:

स्पर्धेतील विजेत्यांना सम्राट क्लब मयेच्या आगामी पदग्रहण / इन्स्टॉलेशन सोहळ्यात (Installation Function) आकर्षक पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल.

रिल पाठवण्याचे माध्यम:

तयार केलेली रिल निकषानुसार अनिकेत ८३९०१३०१७० या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष सम्राट नरेश पेडणेकर, सचिव सम्राट गौरीश बनावलीकर आणि खजिनदार सम्राट अनिकेत मांद्रेकर यांच्यासह क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. गणेशभक्त सदस्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!