सध्या अनेक फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. सायबर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. अश्यातच क्रेडिट कार्ड रिवार्ड्स / पॉईंट्स एक्स्पायरी फसवणूक होत आहे.
फसवणूक करणारे बनावट संदेश पाठवतात की तुमचे क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉईंट्स एक्सपायर होत आहेत. ते तुम्हाला आकर्षक ऑफर देऊन लिंकवर क्लिक करायला किव्हा तुमची कार्ड माहिती सी वी वी, ओटीपी किव्हा लॉगिन क्रेडेशियल्स करायला भाग पाडतात.
यावर पोलिसांनी अश्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करू नका, तुमच्या कार्डची माहिती सी वी वी, ओटीपी, पिन किव्हा पासवर्ड कोणालाही शेयर करू नका, बँक / कार्ड कंपनी कधीही फोन, एस एम एस किव्हा ईमेल द्वारे ही माहिती मागत नाही, रिवार्ड्स पॉईंट तपासण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाईट किव्हा मोबाईल अँप वापरा, एस. एम. एस, ईमेल, मधील लिंक टाईप करण्याऐवजी स्वतः ब्राऊझरमध्ये अधिकृत वेबसाईटला भेट द्या, तुमचा मोबाईल, अँटीव्हायरस आणि ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अपडेट ठेवा अश्या सूचना करण्यात केल्या आहेत.