दुचाकीची धडक बसल्याने सबनीसवाडा येथील रवींद्र हडकर (वय ६७) हे पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या परिसरात असलेल्या मारुती मंदिरासमोर घडला. त्यांना अधिक उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोळपाटे नावाच्या दुचाकी चालकाची त्यांना धडक बसल्याने ते रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. यावेळी तेथून जाणाऱ्या पत्रकार अमोल टेंबकर भुवन नाईक व ओम टेबकर यांनी त्यांना आपल्या चारचाकी मधून अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले

error: Content is protected !!