कोलगाव निरूखे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ या शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या गेले अनेक वर्षे सतावत होती. पाण्याचा प्रमाण मुबलक प्रमाणात नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना देखील अडचणी येत होत्या.

ही गोष्ट कोलगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या कानावर घालण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार असा शब्द यावेळी पदाधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिला होता.

हा शब्द पूर्ण करून विद्यमान आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष संजु परब यांच्या माध्यमातून विहीरीसाठी निधी मंजूर करण्यात आला.यामुळे विद्यार्थ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. मंजूर झालेल्या या विहिरीमुळे पाण्याचा प्रश्न निकाली लागणार असल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

यासाठी शिवसेना उप तालुका प्रमुख राकेश पवार, पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, रोहित नाईक, आशिका सावंत, उगवेकर,अभिजित टिळवे, विजय टिळवे, संजय पवार, सुशांत ठाकर, विवेक टोपले, विद्देश धुरी, शीतल टिळवे, गौरव कुडाळकर,मुकेश ठाकूर, युवराज राणे,आदेश गावडे, राजेंद्र निर्गुण, रविकिरण राऊत, नझिर शेख, योगिनी करमळकर, दिलेश जाधव, भैया राऊळ आदि शिवसेना पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले होते.

error: Content is protected !!