सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात स्थानिक विरुद्ध आयात उमेदवार असा सामना रंगला होता. भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून संदिप गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे तेथील स्थानिक व इच्छुक उमेदवार प्रमोद गावडे उमेदवारी अर्ज भरणार का याची उत्सुकता होती. मात्र आज अखेरच्या दिवशी प्रमोद गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक ग्रामस्थांच्या जोरावर आपण अर्ज भरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र २७ जानेवारीला या मतदार संघातील चित्र स्पष्ट होईल..
