सावंतवाडी : पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित झाले आहे. या मतदार संघात चुरस वाढत आहे. अश्यावेळी शिंदेसेनेतर्फे सुस्मिता सुधाकर जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तळवडे मतदार संघात संघटनात्मक ताकद बघता शिंदे सेनेची फार मोठी ताकद आहे. यामुळे सभापती पद शिंदेसेना आपल्या पदरात निश्चितच पाडू शकते. यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, सूरज परब, आदि पदाधिकारी उपस्थित होते..
