सावंतवाडी : बांदा जिल्हा परिषद साठी युतीचे अधिकृत उमेदवार प्रमोद कामत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.संपूर्ण बांदा पंचक्रोशी मध्ये प्रमोद कामत यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे.कोणत्याही प्रसंगामध्ये धावून जाणारा हक्काचा माणूस म्हणून प्रमोद कामत यांच्याकडे पाहिले जाते.त्यामुळे प्रमोद कामत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होऊ शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. अर्ज दाखल करतेवेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..
