सावंतवाडी : ठाकरे सेनेचे उमेदवार रुपेश राऊळ यांच्या उमेदवारीने तळवडे मतदार संघात आणखीनच चुरस निर्माण केली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तळवडे मतदार संघात आयात उमेदवार आणि स्थानिक उमेदवार असा वाद चालू आहे. याचा फायदा निश्चित रुपेश राऊळ यांना होऊ शकतो. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जात. धनशक्ती पुढे निश्चित जनशक्ती जिंकेल असा विश्वास त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर व्यक्त केला..
