.

सावंतवाडी : गेली अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारण यांचा योग्य ताळमेळ साधत लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मायबाप जनतेने कृपेचा हस्त मस्तकी ठेवल्यामुळे विजय मिळाला होता. यावेळी देखील तमाम जनतेच्या आणि कार्यकर्ते यांच्या पाठबळावर ही निवडणूक लढवीत आहे.ही निवडणूक माझी नाही तर ती कार्यकर्त्यांनी आपल्या हातात घेतली आहे. कार्यकर्त्यांची जिद्द आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे विजयी नक्की होईन असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी उमेदवारी अर्ज भरताना व्यक्त केला. यावेळी मेघश्याम काजरेकर, देवेंद्र टेमकर, शिवदत्त घोगळे, निशिकांत पडते, शैलेश तिळवे, संदीप माळकर, थॉमस डिसोजा, संदीप गवस, मारिया डिमेलो, भरत सावंत, गौरव कुडाळकर, मनोहर ठिकार, तुकाराम कासार, महादेव राऊळ, राहुल राणे, हनु परब, बाळा कारिवडेकर, उमेश भालेकर, ओंकार पडते, समीर धुरी, श्रीहरी धुरी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!