बारावी बोर्ड परीक्षेत कु. गायत्री विवेकानंद बागलकर हिने तब्बल ९५.६७ % गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल तिचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.मनिष दळवी यांच्या हस्ते तिला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गायत्रीच्या मेहनतीचे व जिद्दीचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गायत्रीच्या या यशामुळे तिचे कुटुंब, शिक्षकवर्ग तसेच संपूर्ण जिल्ह्याचा मान उंचावला आहे. तिच्या या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

यावेळी संचालक श्री. प्रकाश बोडस, श्री.व्हीक्टर डान्टस, श्री. गजानन गावडे, श्री. दिलीप रावराणे, श्री. संदीप परब, श्री. विठ्ठल देसाई, श्रीम. प्रज्ञा ढवण, श्री. विद्याप्रसाद बांदेकर तसेच जिल्हा बँक प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. दिवाकर देसाई, माजी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे तसेच जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!