खडतर प्रवास, जिद्द, संयम या जोरावर हव्या त्या यशाला गवसणी घालता येथे याच उदाहरणं म्हणजे नुकतीच मीरा भाईंदर येथे पोलीस ठाण्यात नेमणूक झालेली कोलगाव येथील दीपाली राऊळ..
गेली ४ वर्षे अनेक खडतर आव्हानांना सामोरे जात, कोणत्याही संकटाची तमा न बाळगता धैर्याने सामोरे जात तिने आपले स्वप्न पूर्ण केले.एका सर्वसामान्य कुटुंबात कष्ट करत तिने १२ वी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले.मात्र मनात एकच ध्येय होते ते म्हणजे पोलीस बनन्याचे. यासाठी सकाळी उठून रनिंग असेल, अभ्यास असेल हे सर्व सोपस्कार पूर्ण करत तिने आपले ध्येय गाठले.वडील दिवशी कामाला जाणारे तर आई पण दिवशी कामाला जाणारी. घरातील मोठी मुलगी या कर्तव्याची जाणीव ठेवत आपले स्वप्न ती नेहमी जगत होती आणि ते स्वप्न तिने अखेरीस पूर्ण केले.
दीपालीने मिळविलेल्या या यशाने तिचे सर्व शिक्षक वर्गाने, तिच्या मित्र परिवाराने तिचे कौतुक केले. आपल्या आई वडिलांना सुखात ठेवायचे, त्यांच्या कष्टाना आपली साथ द्यावी हेच आपले ध्येय होते. ते ध्येय आपण पोलीस बनून पूर्ण केल्याचे दीपालीने सांगत आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या..
