ग्लोबल वार्मिंग चे संकट संपूर्ण जगात थैमान घालत आहे. आपला देश सुद्धा यातून सुटला नाही. कधी कोकण हा निसर्गाच्या बाबतीत समृद्ध मानला जात होता. मात्र यातही आता बदल होताना पाहायला मिळत आहे. प्रचंड वृक्षतोडीमुळे पून्हा एकदा हे संकट डोकावताना पाहायला मिळत आहे.
अश्यातच स्वर्गीय विकासभाई सावंत यांची प्रेरणा घेत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोडामार्ग इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग येथे सकाळी ९ वाजता शालेय परिसरात वृक्षारोपण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
एक झाड एक भविष्य, प्लास्टिक प्रदूषणाला समाप्त करूया, यासारखी थीम घेऊन हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत आणि प्रशालेने केले आहे
