एकीकडे पावसाचे प्रमाण असमतोल बनत चाललं आहे. गेली कित्येक वर्षे निसर्ग आपल्याला देत असलेल्या निर्देशांकडे आपण दुर्लक्ष करत निसर्गावर आपण वृक्षतोडीच्या रूपाने अमानुष अतिक्रमण करत आहोत. याचंच रूपांतर अनेक संकटामध्ये होताना पाहायला मिळत आहे. यावर वृक्षारोपण हाच एक उपाय आहे.
हे लक्षात घेऊन जगदगुरु श्रीमद रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांनी वृक्षारोपणाचा संकल्प अखंड वसुंधरेच्या रक्षणासाठी आणि मनुष्य जीवनाचे कल्याण व्हावे यासाठी हाती घेतला होता. दिनांक ५ जुलै ते १९ जुलै २०२६ असा एकंदरीत १५ दिवसांमध्ये हा वृक्षारोपणाचा संकल्प राबविण्यात आला होता. या १५ दिवसात विक्रम करत एकूण ६ लाख १८ हजार नऊ वृक्षारोपण करण्यात आले. रामानंदाचार्य संप्रदायातर्फे सम्पूर्ण भारतभर हा संकल्प आयोजित करण्यात आला होता.
जगदगुरु श्रीमद रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांनी वसुंधरेच्या रक्षणासाठी केलेला हा संकल्प सर्व त्यांच्या सर्व अनुयानांनी जीवाचे रान करत यशस्वी करून दाखविला. आज सगळीकडे ग्लोबल वार्मिंग चा वाढता प्रभाव पाहता अनेक उपाय योजना करण्याबद्दल जागृती केली जाते. मात्र प्रत्यक्षात कृती करून ती यशस्वी केली याबद्दल जगदगुरु श्रीमद रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंदचार्यजी आणि त्यांच्या सर्व अनुयायांचे सर्व स्थरातून विशेष कौतुक केले जात आहे..
