कोकण म्हटला की हापूस आंबा आज जगप्रसिद्ध आहे पण कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक गावठी आंबे रतांबे यांची झाडे दृष्टी आड होत आली आहेत होळी सणात प्रत्येक गावात एक तरी आंब्याचे झाड होळी म्हणून पूजन केले जाते पण नव्याने या आंब्याच्या वृक्षांची लागवड होताना दिसत नाही कोकणातील पारंपारिक आंबा व पेरू मिरी हे वृक्ष आता नामशेष होत आले आहेत या वृक्षांना पुन्हा संजीवनी देण्यासाठी आणि वन्य प्राण्यांना गाव वस्ती वाडी पासून पुन्हा त्यांच्या अधिवासात जंगलात त्यांचे वास्तव्य व्हावे यासाठी त्यांचे खाद्य असलेले पेरू आंबा ही फळ लागवड गावातील मोकळ्या पडीक जागेत करण्याचा नवा संकल्प कलंबिस्त गावात कलंबिस्त पंचक्रोशी मर्यादित दुग्ध व्यवसायिक संस्था व शिवसाम्राज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा पेरू मिरी सुपारी या अत्यंत महत्त्वाच्या जीवनाशी निगडित असलेल्या या वृक्षांचे जतन व संवर्धन चळवळ हाती घेतली आहे जवळपास 70 पारंपरिक गावठी आंबे व मिरी तसेच पेरू असे सुमारे शंभरहून अधिक वृक्षांची लागवड रविवारी धाव गिरे श्वर देवस्थान परिसरातील मोकळ्या जागेत हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲडसंतोष सावंत सचिव माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत उपाध्यक्ष लक्ष्मण राऊळ प्रकाश तावडे राजन घाडी संदीप सावंत बाळकृष्ण मेस्त्री तर शिव साम्राज्य संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश सावंत रोहन सावंत सुभाष उर्फ आप्पाजी देसाई स्वप्नील सावंत विकी सावंत विराज सावंत शेखर मे स्त्री आधी उपस्थित होते
कलंबिस्त हा गाव घरटी सैनिक परंपरा असलेला गाव अशा या गावात निसर्गरम्य असा हा परिसर या गावात डोंगराळ भागात पडीक जमीन मोठ्या प्रमाणात आहेत या गावात पूर्वी आंबा पेरू फणस या वृक्षांची मोठी संख्या होती पण हल्लीच्या काळी हे सर्व नामशेष होत आले आहे कोकणातील ही फळ झाड लागवड आता कमी झाली आहे या कोकणाच्या पारंपारिक आंबे पेरू या प्रजाती वृक्ष पेक्षा कलमी हापूस पायरी आंबे यांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र हे पारंपारिक गावठी आंब्याची झाडे ही होळी सणासाठी होळी पूजनासाठी केली जाते तसेच घराच्या बांधकामासाठी या आंब्याच्या झाडाचे वापर सर्रास होतो पण हल्ली कॉंक्रेटच्या या जमान्यात पारंपारिक आंबा पेरू हे फळ लागवड कोणी करताना आढळत नाही त्यामुळे ही चळवळ आणि पूर्वीची कोकणची आंबा व पेरू मिरी या वृक्षाला पुन्हा जतन व संवर्धन करायचे या हेतूने शिव साम्राज्य संघटना व दुग्ध संस्था या दोन्ही संस्था एकत्र येत शेतकरी व तरुण वर्गाने आपल्या गावातील पडीक मोकळ्या जागेत ही वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तसेच आंबा व फणसाच्या बियां या अशा पडीक भागात पावसाळी ऋतू पेरणी करायची आणि ज्या माध्यमातून नव्याने पारंपारिक आंबा फणस ही वृक्षांची जतन होईल असा नवीन संकल्प हाती घेतला आहे पारंपारिक आंबे ची लागवड फारसी होत नाही पण आंबे खाल्ल्यावर त्याची बी टाकून दिली जाते मात्र या दुग्ध संस्थेने जंगल व आजूबाजूच्या भागात गावठी आंब्याची रोपे यांचा शोध घेऊन ती लागवड करण्याचा अनोखा उपक्रम राबवला
माकड वन्य प्राणी यांना वस्ती पासून रोखण्यासाठी उपक्रम
कलंबिस्त दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड संतोष सावंत यांनी स्पष्ट केले सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावा गावात शहरात माकड व वन्यप्राणी गवारेडे हत्ती वनगाई या गावात वस्तीत येऊ लागले आहेत या सर्व वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे आता शेतकऱ्यांनी आपल्या शेती बागायती करणे सोडून दिले आहे या वन्य प्राण्यांना पूर्वी जंगल भागात त्यांना खाद्य फळ लागवड इथून मिळत होती पण आज जंगलच पूर्णपणे उध्वस्त केली जात आहेत परप्रांतीय यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी गावातील डोंगर दरे हे आपल्या ताब्यात घेऊन येते वस्ती सुरू केली आहे त्यामुळे हे वन्य प्राण्यांचे हे वास्तव्य घर त्यांचे हिरावून घेतले गेल्याने तसेच खाद्य त्यांना मिळत नसल्याने ते गाव वस्तीत शेतात त्याने आपला कब्जा वळवला आहे आणि त्यामुळे या वन्य प्राण्यांना आता रोखण्यासाठी त्यांचे नेहमीचे खाद्य त्यांना जंगलातच पडीक जमिनीत दिले तर निश्चितच ते काही प्रमाणात गाव वस्ती पासून दूर राहतील आणि हाच हे तो ठेवून शेती भागातील डोंगराळ भागात पेरू तसेच फळ लागवड ची वृक्ष लागवड करण्याचे संकल्प केला आहे आणि त्या धरतीवर डोंगराळ पडीक भागात पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे उद्दिष्ट आहे त्याचे हे पहिले पाऊल आहे असे त्यांनी स्पष्ट केले तसेच पारंपरिक आंबा वृक्ष हे आता कमी होत चालले आहेत होळी सणात श्री धावगिरेश्वर येथे .संकल्प केला होता शिव साम्राज्य मंडळातर्फे तरुणांनी दरवर्षी आम्ही जंगल भागात व पडीक जमिनीत पारंपारिक आंब्याची लागवड करण्याचे आणि त्या संकल्पनुसार हा उपक्रम राबवण्यात आला आहे प्रत्येकाने एक तरी फळ लागवड आणि पारंपारिक कोकणच्या वृक्षाची लागवड करा आणि गाव पर्यावरण समृद्ध बनवा आणि पूर्वीची कोकणची शान आणि जान निर्माण करा असा संदेश यानिमित्ताने दिला आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य व दुग्ध संस्थेचे सचिव रमेश सावंत यांनी दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या हिताची अशी फळ लागवड करून गाव समृद्ध बनवला जाईल आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी शिव साम्राज्य .मंडळ ने निसर्ग पर्यावरण शिक्षण आरोग्य पशुसंवर्धन कृषी अशा सर्वच क्षेत्रात तरुणांनी आता पुढे यावे यासाठी आमचे उपक्रम राबवले जातील असा आमचा संकल्प असल्याचे सिद्धेश सावंत व रोहन सावंत यांनी स्पष्ट केले या उपक्रमाला सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ आबा सावंत.भारत पाक व चीन.युद्धातील सैनिक विठ्ठल सावंत यांनी विशेष सहकार्य केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!