सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे माजी मंत्री श्री. दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, आबा केसरकर,नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, विश्वास घाग, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, राजश्री निर्गुण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच उपजिल्हा रुग्णालय तसेच के.एल.ई. हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचीही यावेळी उपस्थिती लाभली. या महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांनीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाचे स्वागत केले
