आमदार दीपकभाई केसरकर यांचा WhatsApp क्रमांक तांत्रिक अडचणीमुळे डिलीट झाल्याने वाढदिवसानिमित्त विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अनेक बातम्या, शुभेच्छा संदेश आणि हितचिंतकांचे प्रेम व्यक्त करणारे संदेश त्यांना वेळेवर पाहता आले नव्हते.

तथापि, आपल्या वाढदिवसानिमित्त विविध वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया तसेच सर्व पत्रकार बांधवांनी दिलेल्या प्रेमळ प्रसिद्धीबद्दल साहेबांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.

याचबरोबर, प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून, संदेशांद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि जनतेचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले असून, सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सदिच्छाच आपली खरी प्रेरणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!