filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: portrait;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 41;

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ व युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अनेकांनी रक्तदान करत शिबीरात सहभाग घेतला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तपेढीचे अधिकारी प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, गोविंद श्रीरामे, रवीना लोहंबरे, प्राची राणे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, दीपक केसरकर यांनी कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली. मात्र त्याचा मोठेपणा कधी घेतला नाही आणि घेणार देखील नाहीत. त्यांचं सरळ, साधे, कोणाचं वाईट न चिंतणार व्यक्तीमत्व आहे‌. या मतदारसंघासाठी केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी कधी घेतलं नाही. त्यांच्यासारखा आमदार या मतदारसंघाला मिळण कठीण असून त्यांना मंत्रीपद मिळावं अशा शुभेच्छा दिल्या. तसेच माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, सुप्रिता धारणकर, भारती परब, पूजा नाईक, शगुप्ता पडवेकर, शितल नाईक, निलम कुमठेकर, राजश्री निर्गुण, विश्वास घाग, गजानन नाटेकर, बासीत पडवेकर, युवा रक्तदाता संघटनेचे संदीप निवळे, वसंत सावंत, ॲड. प्रसाद नाटेकर, पंकज बिद्रे, क्रिश सावंत, भास्कर आमुणेकर, भगवत पोळ, मेहर पडते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!