जिल्हा परिषद सदस्य सुधाकर उर्फ सुधा कवठणकर यांनी आज सातार्डा येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला सदिच्छा भेट दिली. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या उपस्थितीत स्थानिक पशुपालक व शेतकऱ्यांना चारा (मका बियाणे/पिशव्या) वाटप करण्यात आले.

या भेटीत त्यांनी दवाखान्याच्या चालू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच दवाखान्याच्या इमारत दुरुस्तीसंदर्भात सविस्तर विचारपूस केली. इमारतीची तातडीने दुरुस्ती करून परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!