कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या दिवाळी सणाच्या कालावधीत हे प्रदर्शन असणार आहे.
गावातील वाचकांना दिवाळी अंक सहजपणे वाचता यावा यासाठी दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याचा लाभ कलंबिस्त पंचक्रोशीतील गावातील नागरिकांनी घ्यावा असे ज्ञानमंदिर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांच्या हस्ते या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या प्रदर्शनात जवळपास २२ हून अधिक दिवाळी अंक मांडण्यात आले होते. यावेळी प्रथमेश सावंत यांनी कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाने दिवाळी अंक प्रदर्शन भरून वाचकांना एक नवी संधी उपलब्ध करून दिली आहे हे कौतुकास्पद आहे अशा शब्दात त्यांनी गौरव उद्गार काढले.
वाचनालयाच्या वतीने दिवाळी सणात गड किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी सचिव रूपा सावंत, संचालक बाळा राजगे, अनिल सावंत, कृष्णा उर्फ भाई देसाई, संदेश बिडये, विक्रांत तावडे, श्री. पास्ते, खजिनदार रमेश सावंत, संचालक सिद्धेश सावंत, बाबू उर्फ सखाराम सावंत, वसंत सावंत, महेश पास्ते, ग्रंथपाल दीपा श्री. जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री. सावंत यांनी केले. ते म्हणाले, ग्रामीण भागात वाचक वर्ग आहे परंतु त्यांना दिवाळी अंक वाचण्याची संधी मिळत नाही. दिवाळी अंक त्यांना वाचता यावे यासाठी वाचनालयाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी दिवाळी अंक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असे ते म्हणाले.
विशेष करून या दिवाळी अंक प्रदर्शनामध्ये वाचनालयाने खास उपक्रम आयोजित केला आहे. जे सभासद नसतील त्यांनी पन्नास रुपये वाचनालयाकडे डिपॉझिट रक्कम ठेवून दिवाळी अंक वाचनास उपलब्ध करून ठेवला आहे तर सभासदांना मोफत वाचनाची सुविधा देण्यात आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.