अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे विस्तारित बाह्यरुग्ण विभाग (Extension OPD) सुरू करण्यात येत आहे.

दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ओपीडी सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

सदर उद्घाटन समारंभास मा. आमदार श्री. दीपकभाई केसरकर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे संचालक प्रो. वैद्य प्रदीपकुमार प्रजापती, अधिष्ठाता प्रो. डॉ. सुजाता कदम, सावंतवाडी नगरपरिषदेच्या मा. नगराध्यक्षा श्रीमती श्रद्धा लखमराजे भोसले, मुख्याधिकारी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

पुढील आठवड्यापासून नागरिकांसाठी नियमित ओपीडी सेवा सुरू होणार आहे.

📅 ओपीडीचे दिवस: प्रत्येक मंगळवार व शुक्रवार

⏰ वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी २.००

सावंतवाडी व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा तसेच नियमित आयुर्वेदिक ओपीडी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

📍 स्थळ व पत्ता:

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांचे विस्तारित ओपीडी केंद्र, सावंतवाडी.

बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृहाच्या समोर, पहिला मजला, भाजी मंडई इमारत, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.

error: Content is protected !!