विभाग नियंत्रक रा.प.म. कणकवली सिंधुदुर्ग यांना दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी उपसरपंच निगुडे गुरुदास गवंडे यांनी पत्र दिलं होतं. त्या पत्रात त्यांनी ११ फेरींची मागणी केली होती,परंतु दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सहा फेऱ्या सुरू केल्या उर्वरित फेऱ्या नंतर सुरू करू असे सांगितले होते. परंतु आम्हाला ११ ही फेऱ्या हव्या या निर्णयावर गुरुदास गवंडे ठाम असल्यामुळे तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण करा तरच आम्ही उपोषण मागे घेऊ असा इशारा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे दिला होता. त्यामुळे आज विभाग नियंत्रक कणकवली यांच्या आदेशानुसार सावंतवाडी आगर व्यवस्थापक श्री नितीन गावित यांनी सोमवार दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी सर्व फेऱ्या सुरू करू असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्ते यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य इन्सुली नितीन राऊळ, सावंतवाडी पंचायत समिती सदस्य इन्सुली सदानंद राणे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, कास सरपंच प्रवीण पंडित, निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे, माजी उपसरपंच कृष्णा सावळ, माजी सैनिक नाना खडपकर, सागर निगुडकर ,रूपाली राणे ,ममता गावडे, बाप्पा निगुडकर, दक्षता गावडे, अमित निगुडकर, शंकर सावंत, सतीश मोरजकर, रघुनाथ नाईक, सुहासिनी निगुडकर, नारायण गावडे, लक्ष्मण सावंत, मनोहर नाईक, गुरु गावडे, मनोरंजना नाईक, अंजली गावडे, सुभाष निगुडकर, मित्रवंदा गावडे, रत्नप्रभा निगुडकर, राजश्री नाईक, बबीता निगुडकर, सुहासिनी गावडे, लक्ष्मी नाईक, पुष्पलता राणे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अगर व्यवस्थापक श्री नितीन गावित यांनी आपण भारमान चांगले ठेवा प्रवास करा व आपल्याकडून याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा आम्ही बस सेवा आपल्यासाठी कायमस्वरूपी ठेवू असं सांगितले त्यावेळी आम्ही जास्तीत जास्त प्रवास एसटीनेच करणार असे सर्वांनी सांगितले.
