मुंबईतील बोरीवली येथे महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आयोजित या कार्यक्रमात ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले..
महिला सेनेच्या वतीने आयोजित या मेळाव्यात अनेक वक्त्यांनी कुटुंबातील सुसंवाद, परस्पर समजूतदारपणा आणि संस्कारमूल्यांची जपणूक यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना ताई बोर्डीकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात परमपूज्य गुरुमाता सुप्रियाताई, ओमेश्वरीताई, ॲड. कविता सामंत तसेच संस्थापक व सल्लागार मनोवैज्ञानिक डॉ. प्रीती अग्रवाल यांनी ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.या प्रसंगी रामानंद संप्रदायाच्या अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..
