गेली अनेक वर्षे सामाजिक, शेती, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनोहर उर्फ पपू ठिकार यांची कोलगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ् संचालकपदी निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे शेती क्षेत्रात अनेक प्रयोग करत त्यांनी शेतीच्या उत्पादनात वाढ घडवून आणली. त्याचप्रमाणे ठिकार पोल्ट्री फार्म च्या माध्यमातून ते सेवा बजावत आहेत.

विविध कार्यशालेत त्यांनी शेती विषयक, पोल्ट्री फार्म विषयी मार्गदर्शन केले आहे. सहकार क्षेत्रात देखील त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर त्यांना तज्ञ् संचालक म्हणून कोलगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर घेण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, कोलगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष वीरेंद्र धुरी, विद्यमान संचालक माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे, संदीप गवस, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव चव्हाण, लक्ष्मण राऊळ,संचालक शुभांगी घोगळे , सलमा बेगम, रामचंद्र पालव, सचिव रामा म्हसकर , हरिश्चंद्र सावंत ,गोपाळकृष्ण फोंडबा आदि,शेतकरी, ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!