माजगाव सरपंच पदासाठी झालेली पोटनिवडणूकित महायुतीने मोठा विजय मिळवला. महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. रंजना रवींद्र कानसे यांनी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव केला. रंजना कानसे यांना ८८२ मते तर जयश्री सावंत यांना ७२४ मते मिळाली.

या निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न केले गेले होते. मात्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी इथे विजय हा महायुतीचाच होईल हे ठामपणे सांगितले होते. त्या अनुषंगाने त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. योग्य ती रणनीती आखत विक्रांत सावंत यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित केले.

विजयी उमेदवार सौ. रंजना रवींद्र कानसे यांनी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, जिल्हा बँक संचालक- भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, पंचायत समिती सदस्य महेश धुरी यांची भेट घेतली. यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महायुतीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!