माजगाव पोटनिवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवार रंजना कानसे आणि अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. यात रंजना कानसे यांनी बाजी मारली होती. या विजया नंतर माजगाव नवनिर्वाचित सरपंच सौ.रंजना रविंद्र कानसे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सरपंच यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी रवींद्र कानसे, सौ संजना परब उपस्थित होते.
