शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष युवा नेते,तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सामाजिक बांधिलकी, आरोग्य सेवा, आणि सांस्कृतिक जपणुकीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. केवळ शुभेच्छांच्या औपचारिकतेत न अडकता समाजपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श व उपक्रम त्यांच्या कार्यकर्ते मित्रपरिवार आणि हितचिंतक यांच्याकडून राबविण्यात येणार आहे.
जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ करत समाज हिताचे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून आरोग्य शिबिरे, गरजूंना मदत,सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककलेचा सुंदर मिलाप या वाढदिवस सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. विक्रांत सावंत यांच्या जिल्हा परिषद मतदार संघ आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध विद्यालयांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या भव्य वाढदिवस सोहळ्याची सुरुवात २७ मे रोजी मध्यरात्री १२ वाजता ओटवणे हायस्कूलच्या पटंगणावर केक कापून जल्लोषात करण्यात येणार आहे. वाढदिवसाच्या या मंगल क्षणाचे औचित्य साधत त्याच ठिकाणी रसिक प्रेक्षकांसाठी भव्य महिला दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ मे रोजी दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला जाणार आहे सरळ येथील रमाई नगर परिसरात चार हाय स्पीड फॅनचे वाटप करण्यात येणार आहे.
आरोग्य सेवेच्या क्षेत्रातही या वाढदिवसाचे वेगळेपण जपत माजगाव येथील विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी लॉरेन्स अँड मेयो यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात परिसरातील 25 गरजू रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप केले जाणार आहे.याशिवाय दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयातील महिला सूतिकागृहासाठी इंडक्शन मशीन आणि सात लिटर क्षमतेचा थर्मास भेट देण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, तसेच जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी देखील उपयुक्त साहित्य भेट म्हणून देणार आहेत.
संध्याकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे. वेत्ये येथे कलेश्वर पूर्वी देवी मंदिर रात्री साडेआठ वाजता ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तर सोनुर्ली येथे रात्री दहा वाजता कु ळघर रंगमंचावर भव्य दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
केवळ मोठेपण व प्रसिद्धी यांचा उन्माद न करता युवा नेते विक्रांत सावंत यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याचा लाभ घेऊन आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहावे यासाठी आपण सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे..
